ब्रेन वॉश ( भाग २ )
सकाळी सकाळी फोन ची रींग वाजली. पेशंट चा फोन असेल असं वाटलं. बघतो तर काय त्या दिवशी भेटलेल्या मित्राचा फोन होता. तो कॉल करेल असं वाटलं नव्हतं. कारण त्या दिवशी त्याच्या गुरुजी बद्दल मी जे काही बोललो ते ऐकून तो परत मला फोन करेल हे अपेक्षित नव्हतं. मी फोन उचलला, तिकडनं आवाज आला.. "हॅलो विजय " "हं बोल अभय, काय म्हणतोस सांग! " "अरे भाऊ आज आपली मीटिंग ठरली होती न, विसरलास की काय?" " नाही रे, आठवण आहे मला. बोल किती वाजता भेटायचं?" "मी तर आज पूर्ण दिवस रिकामा आहे, तुझी वहिनी गेलीय माहेरी. तू सांग तु कधी फ्री आहेस " "माझं लग्नच झालं नाही त्यामुळे मी फ्रीच असतो नेहमी" "हाहाहा ! मस्त आहे रे तुझं. नशीबवान आहेस मित्रा!" " मी तयार होऊन तुझ्याच घरी येतो दहा वाजेपर्यंत, चालेल?" "बिलकुल चालेल! ये तू , मी वाट बघेन." "ओके! बाय!" असं बोलून मी फोन ठेवला. मी विचारात पडलो. आता आज परत तो विषय निघेल. मी माझा पक्ष मांडेन, तो त्याचा पक्ष ठेवणार. आध्यात्मिक लोकांना सम...