Posts

Showing posts from January 11, 2022

दांभिकांचा कळप - टीजीएफ ( भाग १)

"दांभिक" (hypocrite) म्हणजे अशी व्यक्ती जिच्या कथनी आणि करणी मध्ये अंतर आहे विसंगती आहे. उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती स्वतःला सत्यवचनी आणि सत्यप्रेमी असल्याचा दिखावा करत असेल , तसा दावा करत असेल, मात्र त्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यात खोटारडेपणा व्यक्त होत असेल तर ती व्यक्ती  दांभिक आहे असं म्हटल्या जातं. "ढोंगी" "खोटारडा" "डबल स्टॅंडर्ड" "पाखंडी" हे इतर अर्थ.  अश्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला आपण रोजच बघतो. व्यावहारिकता म्हणून खोटं बोलावं लागतं , कपट करावं लागतं , १०० टक्के खरं बोलणं शक्यच नाही असं म्हणून आपलं वागणं न्यायसंगत कसं आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केल्या जातो. ते बहुतांशी व्यावहारिक आहे, स्वीकारार्ह आहे, परंतु जे लोक स्वतःला सत्याचे प्रचारक म्हणूनच समाजात मिरवत असतात निदान त्यांच्या कडून तरी अशा वागण्याची अपेक्षा नसते.  विशेषतः स्वतःला धार्मिक किंवा अध्यात्मिक म्हणवून घेणारे लोकं स्वतः खूप खोटारडे आणि दांभिक असतात असा मला गेल्या १५ वर्षात बराच प्रत्यय आला.  माझ्या १५ वर्षांच्या अध्यात्मिक यात्रेत मी खूप साऱ्या अध्यात्मिक संस...

दांभिक लोकांचा कळप - टीजीएफ (भाग २)

दांभिक लोकांचा कळप - टीजीएफ (भाग २)  दया , प्रेम, विनम्रता , क्षमाशीलता, मैत्रीभाव ह्या गुणांचं प्रशिक्षण दिल्या जातं टीजीएफ ह्या संस्थेत. परंतु ह्या सर्व फक्त बोलायच्याच गोष्टी आहेत. आचरणात कुणाच्या काहीच नाही. हं , तसा  अभिनय मात्र  करतात सगळेच जण. एकमेकांना भेटताना छान स्माईल देऊन ,  हात जोडून "हॅप्पी थॉट्स" असं अभिवादन करतात. परंतु मनातल्या मनात समोरच्याला जज करत असतात. समोरच्या व्यक्तीचं कोणतं शिवीर झालं आहे, त्यानं किती प्रवचन ऐकले आहेत, तो किती सेवा देतो, किती डोनेशन देतो, हे सगळं जज करून समोरच्याशी व्यवहार केल्या जातो. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर समोरच्याचा "चेतनेचा स्तर" किती आहे हे मनातल्या मनात कॅल्क्युलेट करून ठरवल्या जातं कि त्याच्याशी कसं वागायचं. हा एक प्रकारची स्पृश्य-अस्पृश्यता पाळण्याचाच प्रकार आहे.  जर समोरची व्यक्ती ह्यांच्या गुटातली  असेल म्हणजे ह्यांच्या गुरूंची भक्त असेल, डोनेशन देत असेल, सेवा देत असेल, रेगुलर प्रवचन ऐकत असेल, किंवा ह्यांच्या शिवीरासाठी उपयोगाची असेल, तर  त्याच्याशी  अगदी गोड गोड बो...