दांभिक लोकांचा कळप - टीजीएफ (भाग २)
दांभिक लोकांचा कळप - टीजीएफ (भाग २)
दया , प्रेम, विनम्रता , क्षमाशीलता, मैत्रीभाव ह्या गुणांचं प्रशिक्षण दिल्या जातं टीजीएफ ह्या संस्थेत. परंतु ह्या सर्व फक्त बोलायच्याच गोष्टी आहेत. आचरणात कुणाच्या काहीच नाही. हं , तसा अभिनय मात्र करतात सगळेच जण. एकमेकांना भेटताना छान स्माईल देऊन , हात जोडून "हॅप्पी थॉट्स" असं अभिवादन करतात. परंतु मनातल्या मनात समोरच्याला जज करत असतात. समोरच्या व्यक्तीचं कोणतं शिवीर झालं आहे, त्यानं किती प्रवचन ऐकले आहेत, तो किती सेवा देतो, किती डोनेशन देतो, हे सगळं जज करून समोरच्याशी व्यवहार केल्या जातो. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर समोरच्याचा "चेतनेचा स्तर" किती आहे हे मनातल्या मनात कॅल्क्युलेट करून ठरवल्या जातं कि त्याच्याशी कसं वागायचं. हा एक प्रकारची स्पृश्य-अस्पृश्यता पाळण्याचाच प्रकार आहे. जर समोरची व्यक्ती ह्यांच्या गुटातली असेल म्हणजे ह्यांच्या गुरूंची भक्त असेल, डोनेशन देत असेल, सेवा देत असेल, रेगुलर प्रवचन ऐकत असेल, किंवा ह्यांच्या शिवीरासाठी उपयोगाची असेल, तर त्याच्याशी अगदी गोड गोड बोलतील. पण जर का ह्यापैकी कोणताच गुण समोरच्यात नसेल तर त्या व्यक्तीला वाळीत टाकल्या जाते, बहिष्कृत केल्या जाते.
असे हे एकापेक्षा एक दांभिक लोक टीजीएफ मध्ये भरलेले आहेत. सत्याचा दूर दूर पर्यंत ह्यांच्याशी काहीच संबंध नाही तरी हे स्वतःला "सत्याचार्य" म्हणवून घेतात. ह्यांच्या शिवीरांमध्ये हे तथाकथित सत्याचार्य स्टेज वर जाऊन श्रोत्यांना जेव्हा संबोधित करतात तेव्हा हे त्यांना प्रभावित करण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी सांगतात, तुम्ही आमचं महाअस्मानी शिवीर केल्यानंतर तुमच्या जीवनाचा शारीरिक मानसिक आर्थिक सामाजिक आणि अध्यात्मिक विकास (उच्चतम विकास बरं का !) होईल. परंतु हे सत्याचार्य स्वतःच्या जीवनात डोकावून बघत नाहीत कि खरंच आपला किती विकास झाला आहे? दहा दहा पंधरा पंधरा वर्षांपासून आपण शिवीर करतोय भक्ती करतोय सेवा करतोय , आपल्या जीवनाचा किती विकास झाला? ह्यांच्यापैकी एक सत्याचार्य आहे कुलदीप नावाचा , आता वयाची पंचेचाळीशी गाठली आहे तरी पण आजिविकेसाठी असं कोणतंच काम त्याला करता येत नाही. वडिलांची पेन्शन येते त्यावर स्वतः आणि त्याची बायको जगते. इतरांना युट्युब वर सफलतेचे धडे देणारा हा कुलदीप मात्र स्वतः सुपर डुपर फेल्युअर आहे. अजून एक सत्याचार्य मॅडम आहेत प्रीती आणि त्यांचे मिस्टर महेंद्र , दोघंही नवरा बायको गुरुजींचे कट्टर भक्त , रेगुलर सेवा देतात सत्संगात, परंतु कर्जबाजारीपणामुळे आणि स्वतःच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्या मुळे आर्थिक अधोगतीला गेलेत. एक नागसेन नावाचा सत्याचार्य , गुरुजींचा कट्टर भक्त, पाहायला एकदम देखणा आकर्षक, बोलणं पण समोरच्याला प्रभावित करेल असं, गेल्या पंधरा वर्षांपासून टीजीएफ शी जुळलेला आहे परंतु वैयक्तिक जीवनात फ्लॉप ! कर्जबाजारी होऊन बसला, कर्जदार शोधत फिरतात. ह्या तिघांची उदाहरणं मी दिलीत परंतु असे शेकडो लोकं तिथं ठासून भरलेले आहेत. असा एकही जण नाही ज्याचं नाव घेऊन उदाहरण देता येईल कि बघा हा आहे आदर्श व्यक्ती जो ह्यांच्या गुरुजींची शिकवण घेऊन उच्चतम विकसित जीवन जगतो आहे. असे एकाहून एक "सत्याचार्य" टीजीएफ मध्ये आढळतात.
कुणाच्या वैयक्तिक जीवनावर टिप्पणी करणं ठीक नाही हे जाणून सुद्धा ह्या लोकांची उदाहरणं देणं ह्यासाठी आवश्यक आहे कि हे लोकं जर उद्या तुमच्या घरातल्या तरुण विद्यार्थ्यांना अश्याच बढाया सांगून त्यांच्या गुरूंचा भक्त बनवण्याचा प्रयत्न करतील तर तुम्ही त्यांना प्रतिप्रश्न करू शकला पाहिजेत कि, बाबा रे तू तुझ्या आयुष्यात कोणते तिर मारलेत शिवीर करून?
आर्थिकदृष्ट्या गरीब असणे, बेरोजगार असणे , आजारी असणे ह्यामध्ये काहीही वाईट नाही, वाईट परिस्थिती कुणावरही येऊ शकते. पण आपण तसे असूनही तसे नसल्याचा दिखावा करणे, आमचे शिवीर कराल तर तुम्ही विकसित व्हाल असे खोटे आश्वासन देणे ह्यालाच दंभ ,पाखंड, खोटारडेपणा म्हणतात.
Comments
Post a Comment