ब्रेन वॉश ( भाग २ )
सकाळी सकाळी फोन ची रींग वाजली. पेशंट चा फोन असेल असं वाटलं. बघतो तर काय त्या दिवशी भेटलेल्या मित्राचा फोन होता. तो कॉल करेल असं वाटलं नव्हतं. कारण त्या दिवशी त्याच्या गुरुजी बद्दल मी जे काही बोललो ते ऐकून तो परत मला फोन करेल हे अपेक्षित नव्हतं.
मी फोन उचलला, तिकडनं आवाज आला..
"हॅलो विजय "
"हं बोल अभय, काय म्हणतोस सांग! "
"अरे भाऊ आज आपली मीटिंग ठरली होती न, विसरलास की काय?"
" नाही रे, आठवण आहे मला. बोल किती वाजता भेटायचं?"
"मी तर आज पूर्ण दिवस रिकामा आहे, तुझी वहिनी गेलीय माहेरी. तू सांग तु कधी फ्री आहेस "
"माझं लग्नच झालं नाही त्यामुळे मी फ्रीच असतो नेहमी"
"हाहाहा ! मस्त आहे रे तुझं. नशीबवान आहेस मित्रा!"
" मी तयार होऊन तुझ्याच घरी येतो दहा वाजेपर्यंत, चालेल?"
"बिलकुल चालेल! ये तू , मी वाट बघेन."
"ओके! बाय!" असं बोलून मी फोन ठेवला.
मी विचारात पडलो. आता आज परत तो विषय निघेल. मी माझा पक्ष मांडेन, तो त्याचा पक्ष ठेवणार. आध्यात्मिक लोकांना समजावणं फार कठीण असतं आणि समजावलं तरी हि ते त्यांना जे वाटतं तेच करतात. आणि माझा हेतू तरी काय आहे? आज रविवार. छान घरी बसून गाणी ऐकायची, युट्यूब वर कॉमेडी व्हिडिओज बघायचं सोडून वादविवाद करण्यात काय अर्थ आहे? फोन करून सांगू का माझा मूड नाही भेटण्याचा? पण जाऊ देत, आज विषय कम्प्लिटच करतो. त्याच्या डोक्यात घुसलं तर ठीक, नाही तर मरु देत, मला काय!
ठीक दहा वाजायला पाच मिनीटे कमी असतानाच मी त्याच्या दाराची बेल वाजवली. त्यानं लगेच दार उघडलं. जणू काही आतुरतेनं वाटच बघत होता माझी.
"ये बस विजय" छानसं हसत त्यानं स्वागत केलं माझं. "घर लक्षात होतं तुझ्या हो नं?" त्यानं काहीसं आश्चर्यानं विचारलं.
"हो रे, कितीदा आलोय तुझ्या घरी. विसरायला काही अल्झायमर्स झाला का मला ? "मी बोललो.
"असले भारी भारी आजारांचे नावं नको घेऊस रे बाबा, मी मित्र आहे तुझा पेशंट नाही" तो डोळा मिचकत बोलला आणि किचन कडे गेला.
"अरे अभय काही खायला नको आणूस, मी नाश्ता करून आलोय." मी त्याला किचन पर्यंत ऐकू जाईल अशा आवाजात बोललो.
"गप रे, किती दिवसांनी आलायस तू , चहा करतो छान. माझ्या हातचा चहा पिऊन बघ त्या दिवशी चा चहा विसरून जाशील." तो किचन मधूनच बोलला.
"तो चहा तर कधीच विसरू शकणार नाही रे मी" मला पण त्याची खिल्ली उडवायची बुद्धी सुचली.
"हाहाहा! मला माहित्ये तू आता नेहमी त्या चहा वरून माझी टांग ओढत राहशील." त्याला माझा खोचक स्वभाव माहित होता.
⧫⧫⧫
मी हॉल मधे बसून चोहीकडे नजर फिरवत निरीक्षण करत होतो. एका कोपऱ्यात गुरुजींचा मोठा फोटो. समोर नंदादीप तेवत होता. म्युजिक प्लेअर वर गुरुजींचंच भजन मंद आवाजात सुरु होतं. मोगरा अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. भक्तिमय वातावरण होतं हॉल मध्ये. प्रसन्न वाटत होतं. कोपऱ्यात फिश पॉट ठेवलेला होता, गोल्डफिश एकमेकींच्या मागे धावत होत्या.
तेवढ्यात अभय चहा घेऊन आला. "बघ सांभाळून रे बाबा, नाहीतर सांडवशील माझ्या शर्टावर." मी गमतीनं बोललो.
तो नुसताच हसला.
चहा घेत मी इकडल्या तिकडल्या गोष्टी करायला सुरुवात केली. वहिनी कशा आहेत, मुलगी कशी आहे, नोकरी कशी सुरु आहे इत्यादी. तो थोडक्यात उत्तर देत होता. मी मुद्दामच अध्यात्मिक विषय काढला नाही. परंतु त्यानं तर मला अध्यात्मिक विषयावरच चर्चा करायला घरी बोलावलं होतं. त्यामुळे तो इतर विषयांवर बोलण्यात उत्सुक नव्हता.
मी मग नोटबंदी आणि काश्मीर चा विषय काढत त्याला त्याचं राजकारणावर चं मत विचारलं. तो थोडा वैतागतच बोलला, "सोड रे ते फालतू चे विषय, मला त्यात इंटरेस्ट नाही, मला सांग तु सत्संग सोडून इतके वर्ष काय केलंस? आणि त्या दिवशी तु अध्यात्म आणि गुरूंविषयी जे मत मांडलं ते ऐकून मला धक्काच बसला कि तुझ्यासारखा अध्यात्मिक माणूस एवढा कसा काय विद्रोही झाला? मला तूच त्या सत्संगात पाठवलं होतस दहा वर्षांपूर्वी आणि आता तूच म्हणतोयस कि गुरुजी फ्रॉड आहेत. तुझं असं मतपरिवर्तन बघून धक्काच बसलाय मला."
"जाऊ दे रे, मी त्या दिवशी जे बोललो ते विसरून जा. तुला जे योग्य वाटते ते तू कर. माझ्या बोलण्यावर नको जाऊस." मला माहित होतं कि मी जर बोलायला लागलोच तर खूप तिखट बोलेन. उगाच मैत्रीमध्ये तडा जाऊ शकतो. म्हणून मी स्वतःला आवरतं घेत होतो. पण अभय मानायलाच तयार नव्हता. त्याला त्याच विषयावर चर्चा करायची इच्छा आहे हे लक्षात घेऊन मग मी मनात म्हटलं कि आता होऊनच जाऊ दे, त्याला माझ्या विषयी जे वाटायचं ते वाटू देत पण आज मला बोलावंच लागेल.
"हं बोल, काय विचारायचं ते विचार" मी आता सज्ज झालो युद्धासाठी.
"मला सांग, तुझं अध्यात्म आणि गुरुजीं विषयी मत काय आहे?" मित्राचा पहिला प्रश्न.
"हे बघ, माझं मत तुझ्या फारसं उपयोगाचं नाही. कारण ते 'माझं' मत आहे. पण तरीही माझा अनुभव शेअर करतो तुला. मी जेव्हा अध्यात्म-मार्गात आलो तेव्हा मी नुकताच डॉक्टर झालो होतो, माझ्या आयुष्यात असं काही खूप मोठं दुःख किंवा शोकांतिका पण नव्हती घडली कि ज्यामुळं मी खचून गेलो असेल. बस जीवन आनंदी जगता यावं आणि प्रत्येक क्षेत्रात भरघोस यश मिळावं हि एक इच्छा होती. कुणीतरी सांगितलं कि सत्संगात गेल्यानं मन पवित्र होतं, आणि जीवन आनंदानं जगण्याची कला येते. शिवाय गुरुकृपा झाली तर या जीवनातल्या दुःखांपासून मुक्ती पण मिळते. परमेश्वरापर्यंत पोचण्याचा मार्ग हि सत्संगातूनच जातो. यश, समृद्धी, स्वास्थ्य, आनंद आणि मोक्ष असं कम्प्लिट पॅकेज कुणाला नकोय? म्हणून मी हि नाव नोंदवलं सत्संगात.
पहिलं शिबीर केलं. शिबिरात गुरुजी स्वतः उपस्थित नव्हते, त्यांचे रेकॉर्डेड व्हिडीओज स्क्रीन वर दाखवले जायचे. शिबिरात गुरुजींनी सांगितलं कि स्वीकारभाव सुख तर अस्वीकार दुःख निर्माण करतं. गोष्ट बरोबर होती. मनाला पटली. जीवनात घडणाऱ्या घटनांमध्ये आपण चुकीचा प्रतिसाद दिला तर त्याचे दुःखद परिणाम भोगावे लागतात. हे पण बरोबरच बोललेत गुरुजी. आपल्या चुकीच्या सवयी आणि मान्यता आपलं जीवन किचकट बनवतात. हे सुद्धा अगदी बरोबर बोललेत ते.
गुरुजी फार विद्वान आहेत हे लक्षात यायला वेळ लागला नाही. "ते जे काही सांगतात ते विश्वासार्ह आहे" हे मनाला पटलं आणि त्यांच्यावर विश्वास बसला. शिवाय त्यांची जी मार्गदर्शन शैली होती ती अत्यंत प्रभावी होती. पारंपरिक सत्संगांपेक्षा हे सत्संग वेगळं हि होतं. इथे कडक नियम नव्हते, कठोर आणि किचकट साधना केली पाहिजे हा अट्टहास नव्हता. संन्यास आणि त्याग करावा लागेल अशी अट नव्हती. एकंदरीत अत्यंत प्रभावी असं वातावरण असल्यामुळे तिथे जाण्याची ओढ लागून गेली.
शिबिरांमध्ये जे काही सांगितल्या जाईल ते शिबिराबाहेर कुणाजवळ बोलू नये हा नियम मात्र थोडा विचित्र वाटला होता. पण त्या नियमामागची भूमिका नीट पटवून दिल्या गेली. ज्ञान हे एका विशिष्ट पद्धतीने घ्यायचं असतं आणि तसं न घेतल्यास नुकसान होऊ शकतं हि भीती मनात पद्धतशीररित्या रुजवण्यात आली.
कोणत्याही धार्मिक ग्रंथाचा आधार न घेता, जीवनाशी निगडित अत्यंत महत्वाच्या विषयांवर अमोघपणे गुरुजींना बोलताना बघून कुणालाही विस्मय झाल्याशिवाय राहात नसे. शिबीर दर शिबीर मी गुरुजींचा फॅन होत गेलो. जणू काही कुणी देवदूत गुरुजींच्या रूपात माझ्या मदतीसाठी आकाशातून अवतरला होता. माझं जीवन सार्थक झालं, आता माझ्या जीवनाचं कल्याण झाल्यावाचून राहणार नाही असं वाटायला लागलं. मी सातव्या आकाशात उडत होतो.
क्रमशः ६ ते ७ शिबीर केल्यानंतर गुरुजींशी प्रत्यक्ष भेट होणार होती. आणि आता ती वेळ जवळच आली होती. मी त्यांना प्रत्यक्ष पाहायला, भेटायला आणि बोलायला अगदी आतुर झालो होतो.
पुण्याला जाऊन जेव्हा गुरुजींना भेटलो, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि आनंद बघून जी प्रसन्नता मनाला जाणवली ती अद्भुत होती. गुरुजी अवतारी पुरुष आहेत ह्या विषयी काही शंकाच मनात आली नाही. ते सातवं शिबीर होतं. ते शेवटचं शिबीर असेल हे पहिल्या शिबिरापासून सांगण्यात येत होतं. "अंतिम सत्य" त्या शिबिरात दिल्या जाईल हे सांगण्यात येत होतं. पण....
आता तिथे सांगण्यात आलं कि "तुम्ही ईश्वर आहात " या अनुभवात स्थापित होण्यासाठी अजून पुढं काही शिबिरं करावी लागतील. आठवड्यातून फक्त एक तास द्यावा लागेल. एक तास देणं कठीण नसल्यामुळं कुणालाही आपत्ती नव्हती.

एव्हाना शिबिरार्थींच्या डोक्यात यशस्वीरीत्या हे रुजवण्यात आलं होतं कि गुरुजींची आज्ञा पाळली तरंच मोक्षापर्यंत पोचता येतं. मोक्ष किंवा अंतिम सत्य पाहिजे असेल तर प्रत्येक गुरुआज्ञा पाळणे हाच साधकाचा धर्म आहे हे पक्कं मनात बिंबवलं गेल्यामुळं कोणता साधक आज्ञे बाहेर जाणार?
झालं! नवीन प्रवास सुरु झाला.
"हो, पण इथपर्यंत चा प्रवास छानच तर झाला तुझा. काय नुकसान झालं तुझं?" अभय मधेच बोलला.
" छान झाला न. पण तो प्रवास तिथपर्यंतच छान होता. पुढं काय होणार याची कल्पना नव्हती मला. आतापर्यंत छान झालं तर पुढंही छानच होईल असं वाटत होतं. पण तसं होणार नव्हतं." मी त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत बोललो.
"पुढं काय काय झालं ते सांग मला आता." अभय च्या चेहऱ्यावरची उत्सुकता वाढत चालली होती.
"माझा चहा संपला!"
असंबद्ध उत्तर ऐकून त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. पण लगेच त्याच्या लक्षात आलं कि मी माझ्या संपलेल्या चहा बद्दल बोलतोय.
"हाहा, अरे भरपूर बनवलाय मी चहा. मला माहित्ये तुला चहा खूप आवडतो. म्हणून हा बघ थर्मस भरूनच ठेवलाय चहा." असं म्हणत त्यानं माझ्या कपात चहा ओतला.
"अभय, तुला आठवतं न मी किती निस्सीम भक्त होतो गुरुजींचा?" हे वाक्य बोलताना माझा कंठ दाटून आला होता. मी इमोशनल झालो हे त्याच्या हि लक्षात आलं .
होकारार्थी मान हलवत तो बोलला, "तुझी गुरुजींवर असलेली श्रद्धा इतर साधकांना प्रेरित करायची रे. तू सेवेत असताना आम्ही तुला ऑब्जर्व्ह करायचो. तुझ्या सेवेतही परफेक्शन असायचं. आम्ही तुझ्याकडून शिकायचो. गुरूंची स्तुती करताना तुझ्या डोळ्यात वेगळीच चमक असायची. तुला अतिशयोक्ती वाटेल पण तुझ्या माघारी बरेच साधक आपसात तुझ्याबद्दल बोलायचे कि तुझ्या मुखातून साक्षात गुरूच बोलतात. तू जेव्हा शिबिरात स्टेज वर उभा राहून नवीन साधकांना गुरूंचा परिचय करून द्यायचास न तेव्हा सेवेत असलेले सेवक भारावून जायचेत. शिबिरात सेवा देताना तुझ्यातला "तू" जणूकाही गायब असायचा. मला सगळं आठवतं. म्हणूनच तर मी पार गोंधळून गेलो तुझं बोलणं ऐकून. आता तू जे बोलतोयस ते माझ्यासाठी अनाकलनीय आहे. मी तुझ्या बोलण्यावर अविश्वास पण करू शकत नाहीये आणि विश्वास ठेवणं हि तितकंच कठीण आहे. एकीकडे गुरुजी आणि एकीकडे तू. माझ्यासाठी दोघेही महत्वाचे आहेत."
अभय आता खरंच खूप गोंधळलेला दिसत होता. त्याला तसं बघून मला असं वाटायला लागलं की मी उगाच त्याला छेडलं. मी राहू द्यायला हवं होतं त्याला भ्रमातच. कमीत कमी सत्संगाच्या नावावर जे मनोरंजन चाललं होतं ते तरी त्याला एन्जॉय करता आलं असतं. मी विनाकारण त्याला कन्फ्युज तर करत नाही आहे ना? पण मला माहीत होतं कि तो तसाही काही वर्षांत कन्फ्युज होईलच, तेव्हा कदाचित त्याला सावरायला वेळही मिळणार नाही. आता माझीच जवाबदारी आहे त्याला त्या मोहक दिसणाऱ्या जाळ्यातून मोकळं करण्याची. कारण त्या जाळ्यात मीच लोटलं होतं त्याला. कठीण आहे पण मला प्रयत्न करायलाच हवा.
"बघ अभय, मी आता जे काही बोलणार आहे ते थोडं कडू आहे, क्रूड आहे. पण हा सुंदर मनमोहक दिसणारा आध्यात्मिक पिंजरा कसा आपल्याला आपल्याच मर्जीनं स्वतःला कोंडून घ्यायला भाग पाडतो, आपण पिंजऱ्यात असुनही आपल्याला त्याची जाणीव कशी होत नाही , कसा आपल्याला भ्रम होतो कि आपणच योग्य मार्गावर आहोत आणि उरलेलं सगळं जग भरकटलेलं आहे. ह्या पिंजऱ्यामुळे आपला कसा घात होतो, ह्याच्या आंत राहून आपलं काय काय नुकसान होतं आणि ह्या पिंजऱ्यात आपल्याला ओढून घेणाऱ्याचा हेतू काय, फायदा काय, हे सगळं मी तुला व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. होय, केवळ प्रयत्न! कारण मला हि खात्री नाही कि तू अजून या पिंजऱ्यातून बाहेर येण्यास तयार आहेस कि नाही ते. ह्या पिंजऱ्यानं तुला आणि तू या पिंजऱ्याला घट्ट पकडून ठेवलंयस . मी प्रयत्न करेन , पण शेवटी तु काय ठरवशील ते अनिश्चित आहे." माझं हे बोलणं ऐकून अभय जरासा घाबराघुबरा झाला. त्याची देहबोली ( बॉडी लँग्वेज ) बदलली, त्यानं हाताची घडी बांधली, ह्याला "डिफेन्सिव्ह पोजिशन" म्हणतात. जेव्हा समोरची व्यक्ती आपल्या मतांचं खंडन करायला सुरवात करते तेव्हा माणूस डिफेन्सिव्ह पोजिशन मध्ये जातो. आपल्या मान्यता प्रत्येक व्यक्ती साठी अनमोल असतात. त्या मान्यतांवर जर कुणी आक्रमण करायचा प्रयत्न केला तर आपलं अंतर्मन आपोआप आपल्या शरीराला डिफेन्सिव्ह मोड मध्ये घेऊन जातं. हि आपल्या शरीर आणि मनानं दिलेली एक प्रकारची सुरक्षात्मक प्रतिक्रिया असते. अभय ला भीती वाटणं स्वाभाविक होतं, कारण मी त्याच्या त्या भावनांवर आक्रमण करायच्या तयारीत होतो ज्या भावनांशी तो एकरूप झाला होता, ज्यांना त्यानं आपला धर्म म्हणून स्वीकारलं होतं. शस्त्रक्रियेपूर्वी पेशंट जसा anxious होतो तसाच तो झाला होता म्हणून त्याला आधी थोडं रिलॅक्स करावं लागणार होतं.
➤➤➤
भाग ३रा लवकरच प्रकाशित होईल.
परत एकदा धन्यवाद !
Ye Abhay kon hai ?
ReplyDeleteKeep Writing!!!
ReplyDeletesure bro !
Delete