Posts

दांभिकांचा कळप - टीजीएफ ( भाग १)

"दांभिक" (hypocrite) म्हणजे अशी व्यक्ती जिच्या कथनी आणि करणी मध्ये अंतर आहे विसंगती आहे. उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती स्वतःला सत्यवचनी आणि सत्यप्रेमी असल्याचा दिखावा करत असेल , तसा दावा करत असेल, मात्र त्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्यात खोटारडेपणा व्यक्त होत असेल तर ती व्यक्ती  दांभिक आहे असं म्हटल्या जातं. "ढोंगी" "खोटारडा" "डबल स्टॅंडर्ड" "पाखंडी" हे इतर अर्थ.  अश्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला आपण रोजच बघतो. व्यावहारिकता म्हणून खोटं बोलावं लागतं , कपट करावं लागतं , १०० टक्के खरं बोलणं शक्यच नाही असं म्हणून आपलं वागणं न्यायसंगत कसं आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केल्या जातो. ते बहुतांशी व्यावहारिक आहे, स्वीकारार्ह आहे, परंतु जे लोक स्वतःला सत्याचे प्रचारक म्हणूनच समाजात मिरवत असतात निदान त्यांच्या कडून तरी अशा वागण्याची अपेक्षा नसते.  विशेषतः स्वतःला धार्मिक किंवा अध्यात्मिक म्हणवून घेणारे लोकं स्वतः खूप खोटारडे आणि दांभिक असतात असा मला गेल्या १५ वर्षात बराच प्रत्यय आला.  माझ्या १५ वर्षांच्या अध्यात्मिक यात्रेत मी खूप साऱ्या अध्यात्मिक संस

दांभिक लोकांचा कळप - टीजीएफ (भाग २)

दांभिक लोकांचा कळप - टीजीएफ (भाग २)  दया , प्रेम, विनम्रता , क्षमाशीलता, मैत्रीभाव ह्या गुणांचं प्रशिक्षण दिल्या जातं टीजीएफ ह्या संस्थेत. परंतु ह्या सर्व फक्त बोलायच्याच गोष्टी आहेत. आचरणात कुणाच्या काहीच नाही. हं , तसा  अभिनय मात्र  करतात सगळेच जण. एकमेकांना भेटताना छान स्माईल देऊन ,  हात जोडून "हॅप्पी थॉट्स" असं अभिवादन करतात. परंतु मनातल्या मनात समोरच्याला जज करत असतात. समोरच्या व्यक्तीचं कोणतं शिवीर झालं आहे, त्यानं किती प्रवचन ऐकले आहेत, तो किती सेवा देतो, किती डोनेशन देतो, हे सगळं जज करून समोरच्याशी व्यवहार केल्या जातो. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर समोरच्याचा "चेतनेचा स्तर" किती आहे हे मनातल्या मनात कॅल्क्युलेट करून ठरवल्या जातं कि त्याच्याशी कसं वागायचं. हा एक प्रकारची स्पृश्य-अस्पृश्यता पाळण्याचाच प्रकार आहे.  जर समोरची व्यक्ती ह्यांच्या गुटातली  असेल म्हणजे ह्यांच्या गुरूंची भक्त असेल, डोनेशन देत असेल, सेवा देत असेल, रेगुलर प्रवचन ऐकत असेल, किंवा ह्यांच्या शिवीरासाठी उपयोगाची असेल, तर  त्याच्याशी  अगदी गोड गोड बोलतील. पण जर का ह्यापैकी कोणताच गुण समोर

बिल्ला

   तुम्ही कधी मारुती कार च्या बोनेट वर मर्सिडीज चा लोगो लावलेला बघीतलाय का? काही जण हौस म्हणून आपल्या कार वर महागड्या गाड्यांचे लोगो लाऊन मिरवतात. असं केल्यानं आपली गाडी मर्सिडीज कंपनी ची आहे असं लोकांना वाटेल आणि आपली शान वाढेल असा गोड गैरसमज करून घेतात बिच्चारे!     पण तसं काही होत नाही. गाडी खरंच महागडी आहे का हे तिच्यावर चिकटवलेल्या लोगोवरुन नाही तर तिच्या दिसण्यावरुन ओळखायला येतं. पण काही जण इतके कलंदर असतात कि ते कार ची रंगरंगोटी सुद्धा लक्झरी कार सारखी करुन ठेवतात त्यामुळे काही लोकांना ते फसवण्यात यशस्वी होतात. पण तरीही जे कार चे खरे जाणकार आहेत ते सहज ओळखू शकतात कि ही कार नकली आहे !     मी हे कारचं उदाहरण देऊन काय सांगायचा प्रयत्न करतोय हे तुमच्या मनात चाललं असेल, हो ना?  तर मी आता स्पष्टिकरण करुन सांगतो.     हि तर झाली गाड्यांची गोष्ट. परंतु माणसंही गाड्यांसारखीच असतात. तुम्ही म्हणाल माणसांवर कुठं लोगो चिकटवलेले असतात? आठवा कधीतरी कुठंतरी तुम्ही माणसांवरही लोगो चिकटवलेला बघीतला असेल. आठवलं?      हो अगदी बरोबर. तेच म्हणायचं आहे मला. कोणत्या तरी सत्संगाचा किंवा गुरु मह

ब्रेन वॉश ( भाग ३ )

मला माहित होतं कि आपल्या गुरूंची आलोचना ऐकून घेणं सहज नव्हतं अभय साठी. म्हणून मी त्याला आधी एक प्रश्न केला. मी त्याला विचारलं, "गेली दहा वर्षे तू स्वीकारभाव वाढवण्याची साधना करतोयस, तर आता काहीही ऐकून घेण्याइतका स्वीकारभाव तर नक्कीच आला असेल तुझ्यात, हो ना?" "हो नक्कीच. तू बिंदास बोल, मी चिडणार नाही." अभय जरा अति आत्मविश्वास दाखवत बोलला. "ऐक तर. पण मी जे सांगतोय ते ऐकताना तू थोडा प्रयत्न करशील कि जे काही मी सांगेन ते कोणत्याही आध्यात्मिक मान्यतांच्या गाळणीतुन फिल्टर करून ऐकायचं नाही. असं ऐक जणू तू अध्यात्म मार्गात अजून गेलाच नाहीस. अगदी तसंच जसं तू दहा वर्षांपूर्वी ऐकलं होतंस. कठीण आहे, पण कर प्रयत्न."  अभय न हलकंसं हसत होकार दर्शवला.  "बघ, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात छोटी मोठी दुःखं येतातच. प्रत्येकाला सुखाची ओढ असते आणि दुःख नकोसं असतं. दुःखापासून दूर राहणे हीच प्रत्येकाची इच्छा असते. पण सुखद किंवा दुःखद घटनांवर आपलं काहीच नियंत्रण नाही हे कटुसत्य प्रत्येकाला माहित असतं. आपण कितीही प्रयत्न केला तरीही आपण घडणाऱ्या घटनांना रोकु

ब्रेन वॉश ( भाग २ )

सकाळी सकाळी फोन ची रींग वाजली. पेशंट चा फोन असेल असं वाटलं. बघतो तर काय त्या दिवशी भेटलेल्या मित्राचा फोन होता. तो कॉल करेल असं वाटलं नव्हतं. कारण त्या दिवशी त्याच्या गुरुजी बद्दल मी जे काही बोललो ते ऐकून तो परत मला फोन करेल हे अपेक्षित नव्हतं. मी फोन उचलला, तिकडनं आवाज आला..  "हॅलो विजय " "हं बोल अभय, काय म्हणतोस सांग! " "अरे भाऊ आज आपली मीटिंग ठरली होती न, विसरलास की काय?" " नाही रे, आठवण आहे मला. बोल किती वाजता भेटायचं?" "मी तर आज पूर्ण दिवस रिकामा आहे, तुझी वहिनी गेलीय माहेरी. तू सांग तु कधी फ्री आहेस " "माझं लग्नच झालं नाही त्यामुळे मी फ्रीच असतो नेहमी" "हाहाहा ! मस्त आहे रे तुझं. नशीबवान आहेस मित्रा!" " मी तयार होऊन तुझ्याच घरी येतो दहा वाजेपर्यंत, चालेल?" "बिलकुल चालेल! ये तू , मी वाट बघेन." "ओके! बाय!" असं बोलून मी फोन ठेवला. मी विचारात पडलो. आता आज परत तो विषय निघेल. मी माझा पक्ष मांडेन, तो त्याचा पक्ष ठेवणार. आध्यात्मिक लोकांना सम

ब्रेन वॉश ( भाग १ )

बऱ्याच दिवसांनी आज अचानक एका जुन्या  मित्राची भेट झाली. सिग्नल वर थांबलो तर तो माझ्या शेजारीच उभा होता. "अरे अभय कसं काय ? कुठे फ़िरतोयस ?" मी त्याला विचारलं. "अरे मी सेंटर वर गेलो होतो सत्संग ऐकायला. तो बोलला. आणि तु का बरं येत नाहीस आता श्रवणाला ?" त्याचा प्रश्न.   मी सिग्नल कडे पाहिलं तर सिग्नल हिरवा व्हायला २८ सेकंद शिल्लक होते. आता त्यानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर २८ सेकंदात देता येणं शक्य नव्हतं. त्याचा प्रश्न सहज असता तर फक्त स्माईल देऊन निघून गेलो असतो. पण प्रश्न विचारताना त्याच्या डोळ्यात तीच उत्सुकता होती जी दहा वर्षांपुर्वी त्याच्या डोळ्यात होती. दहा वर्षांपुर्वी मीच त्याला त्या सत्संगाचा रस्ता दाखवला होता. म्हणून मी त्याला म्हटलं "चल आपण चहा घेऊयात. सविस्तर बोलणं पण होईल आपलं."  त्यानं आनंदानं होकार दिला. सिग्नल सुटला आणि आम्ही जवळच एका हॉटेलात जाऊन बसलो.  ⧫⧫⧫ "जवळपास चार-एक वर्षांनी भेटतोय ना आपण ?"  त्यानंच सुरुवात केली संभाषणाला. "अरे हो ना झालेच अस